Friday, 3 February 2017

३१ डिसेंबर ची पार्टीची घोषणा

आमच्या १०वी अ या whatsapp समूहाचा मी अड्मीन असल्यामुळे पोर कायमच पार्टी मागत आली आहेत. यावर्षी पार्टीचा योग जुळून आला तो खालीलप्रमाणे:


नमस्कार मित्रोssssssssssssss............
बघता बघता २०१६ वर्ष संपत आले. कसे गेले ते कळलेच नाही..
जानेवारी आला गेला, फेब्रुवारी आला गेला, मार्च आला गेला, एप्रिल आला गेला, मे आला गेला, जून आला गेला, जुलै आला गेला, ऑगस्ट आला गेला, सप्टेंबर आला गेला,ऑक्टोबर आला गेला, नोव्हेंबर आला गेला...........
आणि आता शेवटी उजाडला तो शेवटचा महिना....  तो म्हणजे डिसेंबर...
डिसेंबर महिना उजाडताच समूहातील सदस्यांना उत्सुकतेने वेध लागतात ते एडमीन ने ३१ डिसेंबर ची पार्टी देण्याचे...
तर मित्रोssssssss...
एक सुप्रसिद्ध असे एक वचन आहे ।
ते असे की,
निद्रा आणि वचन कधीही अपूर्ण राहू नये 
तर, समुहातील उत्साही सदस्य 2016 च्या वर्षपूर्तीनिमित्त अॅडमिन ला सारखी सारखी पार्टी मागत होते/आहेत ।
तर, तुमचा अॅडमिन अतिशयच (नेहमीप्रमाणेच) दिलदार असल्यामुळे त्याने ते अतिशय मनावर व हृदयाला लावून घेतले ।
आणि पार्टीचे नियोजन करण्याचे ठरवले ।
पार्टी मिळण्यासाठी सदस्य विविध प्रकारे अतिशयच जोरदार प्रयत्न करतात..

होली कब है, होली कब है ?
च्या धर्तीवर सदस्यांनी
पार्टी कब है, पार्टी कब है ?
अशा घोषणा देऊन माझा Whatsapp चा inbox दणाणून सोडून दिला।

आणि मग दिलदार एडमीन ने प्रेमळ सदस्यांना पार्टी देण्याचे आश्वासक वचन दिले.. आणि पार्टीचे नियोजन करण्यात अतिशयच व्यस्त झाला..
दिवस रात्र सदस्य पार्टी पार्टी अशा घोषणा देत आहेत, अशी स्वप्ने जागे असताना पडू लागली..

मोदीच्या नोटबंदीच्या काळात एवढ्या सदस्यांना एवढी मोठी पार्टी देणे हे एक फारच (अतिशयच) मोठेअसे आव्हान होते..  पण एडमीन च्या कर्तृत्वापुढे हे आव्हान शिवधनुष्य करंगळीने पेलण्यासारखे सोपे होते..
आणि एडमीन नियोजनाला लागला...

तर आता शेवटी पार्टीची final announcement करतो... 👅👅😊☺

शेवाळे बंधुंच्या आशीर्वादाने आणि एडमीन च्या management हि ३१ डिसेंबर ची जंगी पार्टी करण्याचे योजिले आहे.  ३१ डिसेंबर रोजी एडमीन ला दुसरी महत्वाची विधायक कामे असल्यामुळे हि पार्टी थोडीशी लवकर करण्याचे ठरवले.. शिवाय ३१ डिसेंबर ला पोलिसांचा ठीक ठिकाणी अतिशय कडक असा बंदोबस्त असतो.. आपल्या समूहातील सदस्यांचा कर्तव्यदक्ष पोलिसांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून देखील पार्टी लवकरच करण्याचे ठरवले..
पार्टी चे स्थळ, काळ, वेळ, time, मुहूर्त, समय, नक्षत्र, ई. खालीलप्रमाणे:                                                                                                                     तर पार्टी हि येत्या २४ डिसेंबर, २०१६ (शनिवारी) रोजी करण्याचे योजिले आहे.
पार्टी चे स्थळ: लक्ष्मि lawns, मगरपट्टा , वेळ- सायंकाळी ७ च्या पुढे ।

विशेष टीप- समूहातील तंगाट सदस्यांनी आपापली पिण्याची सोय करावी. एडमीन हा मारुतीचा भक्त असल्यामुळे पार्टी हि पूर्ण पणे शाकाहारी राहील.
येण्या जाण्याची सोय आपापल्या परीने करावी. येण्या जाण्याचा भत्ता एडमीन ला मागू नये. जमल्यास येताना स्वचित्रदांडू घेऊन यावा कुणाकडे असल्यास, म्हणजे आपल्याला स्वचीत्र काढणे सोपे होईल..
आणि परत inbox मध्ये येऊन पार्टी कब हे, पार्टी कब हे?? असे विचारून एडमीन ला त्रास देऊ नये..

पार्टी साठी आपली सर्वांची उपस्थिती गरजेची आहे नाहीतर एडमीन चे management व्यर्थ आहे..
धन्यवाद.. भेटू पार्टी ला..

(पार्टी ची टीप कुणीही पोलिसांना देऊ नये हि नम्र विनंती)
एडमीन ने एक बार commitment कर दि तो कर दि....
फिर वो खुद एडमीन कि भी  और Jan Koum कि भी नहि सुनता..
आणि वाचुन झाल्यावर पोस्टवर कमेंट करन्यास कंजूषपणा करू नये ।



असा हा निमंत्रनाचा भला मोठा मेसेज..

यावर समूहातील सदस्य प्रसाद गव्हाणे यांनी खालील शब्दप्रयोग सुचवले:

Inbox - अंतरखोके
Management - व्यवस्थापन
Announcement - घोषणा/जाहीर
Commitment - वचन

Saturday, 21 January 2017

वाढदिवसाच्या शुभेच्छा

कुणाचा वाढदिवस असल्यास तेच तेच forwarded मेसेज पाठवण्यापेक्षा शुभेच्छा स्वतः तयार पाठवण्यात वेगळीच मजा... तर असाच एक शुभेच्छा मेसेज....


समुहातील माननीय व्यक्तिमत्व श्री. विपूल(आप्पा) शेवाळे
यांची तब्येत अकस्मितरीत्या खालावल्यामुळे त्यांना तातडीणे गोपाळपट्टी येथे नवजीवण या हाॅस्पिटलमधे अॅडमिट केले आहे ।
तरी उद्या 19 जुलै रोजी आप्पाचा वाढदिवस आहे ।
शरीराला आरामाची गरज असल्यामुळे कुणीही त्याला रात्री काॅल करू नयै ही विनंती । शुभेच्छा द्यायच्या असल्यास मला काॅल करावा व सर्व भेटवस्तू माझ्याकडे ठेवाव्यात। मी तिथेच असेन ।
धन्यवाद ।




आज
1⃣9⃣ जुलै,  22 लाखात लक्षात लक्षात ठेवावा असा एक अविस्मरणीय असा दिवस. सगळ्यांना वाटत असेंन कि काय आहे बर असा यादिवशी तर सांगतो 19 जुलै याच शुभदिवशी आमचे आदरणीय मित्र मा. श्री. विपुल शेवाळे यांचा जन्मदिवस...!
🎂🎂🎂
आप्पांचा थोडक्यात परीचय=
★आपल्या सर्वांचे लाडके😘
★10 A चे आधारस्तंभ
★सुप्रिया सुळेंच्या सतत संपर्क
★काश्मीर प्रश्नावर सतत चिंता करणारे
★शिवकृपा एंटरप्राईझेस या पुणे-सोलापूर रोडवरील सगळ्यात मोठ्या HARDWARE दुकानाचे मालक, आपल्या मित्रांना👬 नेहमीच DISCOUNT देणारे
★सामजिक कार्यकर्ते
★IAS बनन्याचे स्वप्न बाळगून ते पूर्ण करून जनतेची सेवा करणारे
★वर्षभर विविध मांसाहारी🍤🍗 डिशेष वर ताव मारणारे परंतु श्रावण चालू झाल्यावर चावणार्या डासालाही न मारणारे असे अहिंसक तसेच आध्यात्मिक व्यक्तिमत्व
★दुष्काळात समूहातील मेंबर ला पाणी न नाकारणारे(काहींनी पाणीपट्टी येती म्हणून पाणी नाकारले)
★कर्मण्येवाधिकारस्ते या फलेषु कदाचन
या श्लोकाप्रमाणे नेहमीच आचरण बाळगणारे आणि ईतरांनाही श्लोकाचे जिवनातील महत्त्व पटवून देणारे
★ येण्यार्या काळातील पश्चिमेकडून उगवणारे नेतृत्व 🌄, कधीही न मावळणारे
★एका शब्दावर आपली क्लासिक 350 हजार करणारे
★राष्ट्रवादी काँगेर्सचे कट्टर विरोधक व राजकीय भ्रष्टाचारावर परखड भाष्य करनारे
★नुकतेच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण  झालेले पण बेरोजगरीमुळे अध्यात्मिक मार्गाकड वळलेले
★दुसर्याच् वाइट चितुन कोणाच भल होत नाय।
हा संदेश तळागाळापर्यंत पोह्चावणारे
★फडनविसांचे निकटवर्तीय
★पिकल्या पानाचा देठ हिरवाच का असा प्रश्न विचारणारे
★मुली या आदर करण्यासाठी असतात अशी भावना ठेवून
वाह काय माल आहे असे हळूच म्हणणारे
★उत्कृष्ट कथाकार, कविता लिहीणारे📝
पण प्रसिध्दी पासून नेहमीच लांब असनारे, आपल्या लिखानाचा ईतरांना फायदा करून देणारे असे अनोखे व्यक्तिमत्व असलेले
★जगदाळे गोडेतेल चे भागीदार
★भविष्यत शेवाळेवाडीला शांघाय बनवण्याचा मानस असलेले
★HTC संस्थानाचा भ्रमणध्वनी 📱वापरून संथानाचा गौरव वाढवणारे
★गणेशोत्सव काळात पोलिसांना सहकार्य करा असे सांगू स्वतः पोरीमागे फिरणारे
★बुलेट क्लासिक 350 असूनही फक्त लवंगी फटाके फोडणारे🎆 असे पर्यावरणाची काळजी घेणारे


असे हे आमचे आदरणीय मित्र, आपणास वाढदिवसानिम्मित कोटी कोटी शुभेच्छा..!!🎂

'आप'  रीलायन्सजियो हजारो साल😊

💐💐💐शुभेच्छुक💐💐💐
■अक्षय आंबेकर ( आंब्याचे🍋 सुप्रसिद्ध व्यापारी, भावी सरपंच- कुंजीरवाडी )
■ निखिल जगदाळे(संस्थापक अध्यक्ष-जगदाळे गोडेतेल, टग्या संघटना)
■अजिंक्य निकम(क्रीडामंत्री-१०अ)
■तेजस पिसाळ(अध्यक्ष-अखिल अलिस्टर कूक मित्र परिवार, BOURNVITA/BOOSTER या ऊंची वाढवणार्या कंपण्यांचे BRAND AMBASSADOR)
■नचिकेत भाऊ देशमाने ( मंतरवाडी युवा मंच , मनसेचे आगामी विधानसभा संभाव्य उमेदवार )
■चेतन मगदूम(नवनिर्वाचित कर्मचारी-JCB🚜, माजी पेरू बागायतदार🍐)
■ मयूर मोरे(अध्यक्ष-अखिल भारतीय अध्यात्मिक परिषद)
■सुकूमार झुरंगे ( डेल या कंपनीचा ₹1,10,000 किंमतीचा लॅपटाॅपचे💻 मालक)
■अमोल उर्फ सनी भास्कर ( गंगानगरच्या पोरींचा हिरो,  Being Human मधले सगळ्यात मोठे Human👶🏼)
■विकास गावडे (अखिल भारतीय झाकर संघटना अध्यक्ष-अखिल भारतीय 'अवजड' मालवाहतूक संघटना)🚚🚚
■देवेंद्र काळभोर(थेट स्पेन वरून⛴🚤🚀)
■धनंजय भाडळे ( टाटा गोडावूनचे मालक 🚐, उरूळी देवाची मधील पच्शिमेकडून उगवणारे युवा नेत़त्व 🌄, भविष्यातील मोदींचे परराष्ट्रीय खात्याचे सल्लागार )
■चंद्रकांत पातारे उर्फ भावड्या ( सायकल ग्रुप, स्थापत्य अभियंता 🏢)
■चेतन उर्फ चिची गोडसे (सायकल ग्रुप ,  भविष्यातील पाण्यावर/हवेवर गाडी चालवणारे अवसरीचे सुप्रसिद्ध AUTOMOBILE ENGINEER 🚅🚡✈🚀🚈)
■अभिषेक आण्णा देसाई (अखिल भारतीय Builder Association अध्यक्ष 🏢🏫, मांजरी गावचे रहीवासी )
■अमित मेहता(diamond classes🔷)
■सुनील वीर(भारतीय जनता पक्ष,हडपसर)
■रोहन कदम(राजेश्वरी नर्सरी🌺,प्रसिद्ध भोपळा व्यावसायिक)
■अविनाश शेळके(प्रसिद्ध घाणेरड्या चित्रफीत संग्रहालयाचे संस्थापक अध्यक्ष)
■सुरज जाधव(भावी कृषी अधिकारी👤)
■शुभम कुदळे(मॅग्गी उद्योजक🍜)
■अनिकेत खामकर(आपल्या भाकड कथा सांगून समूहाचे मनोरंजन करणारे😖)
■अविनाश शेळके ( कात्रज डेअरीचे सर्वात मोठे दूध पुरवठादार🍼, स्त्रीहरी स्त्रीहरी चा जप करणारे, पाठीचा त्रास असूनही नियमीत शाळा/काॅलेज करणारे🏨, कुठेही पाणी दिसताच नमस्कार करणारे🙏🏿, कुदळेच्या व्यवसायातील मोठा भागीदार, सनी देओलचे मोठे चाहते )
■सिद्धांत महाडीक(प्रसिद्ध हॉटेल व्ययसायिक)