आमच्या १०वी अ या whatsapp समूहाचा मी अड्मीन असल्यामुळे पोर कायमच पार्टी मागत आली आहेत. यावर्षी पार्टीचा योग जुळून आला तो खालीलप्रमाणे:
नमस्कार मित्रोssssssssssssss............
बघता बघता २०१६ वर्ष संपत आले. कसे गेले ते कळलेच नाही..
जानेवारी आला गेला, फेब्रुवारी आला गेला, मार्च आला गेला, एप्रिल आला गेला, मे आला गेला, जून आला गेला, जुलै आला गेला, ऑगस्ट आला गेला, सप्टेंबर आला गेला,ऑक्टोबर आला गेला, नोव्हेंबर आला गेला...........
आणि आता शेवटी उजाडला तो शेवटचा महिना.... तो म्हणजे डिसेंबर...
डिसेंबर महिना उजाडताच समूहातील सदस्यांना उत्सुकतेने वेध लागतात ते एडमीन ने ३१ डिसेंबर ची पार्टी देण्याचे...
तर मित्रोssssssss...
एक सुप्रसिद्ध असे एक वचन आहे ।
ते असे की,
निद्रा आणि वचन कधीही अपूर्ण राहू नये
तर, समुहातील उत्साही सदस्य 2016 च्या वर्षपूर्तीनिमित्त अॅडमिन ला सारखी सारखी पार्टी मागत होते/आहेत ।
तर, तुमचा अॅडमिन अतिशयच (नेहमीप्रमाणेच) दिलदार असल्यामुळे त्याने ते अतिशय मनावर व हृदयाला लावून घेतले ।
आणि पार्टीचे नियोजन करण्याचे ठरवले ।
पार्टी मिळण्यासाठी सदस्य विविध प्रकारे अतिशयच जोरदार प्रयत्न करतात..
होली कब है, होली कब है ?
च्या धर्तीवर सदस्यांनी
पार्टी कब है, पार्टी कब है ?
अशा घोषणा देऊन माझा Whatsapp चा inbox दणाणून सोडून दिला।
आणि मग दिलदार एडमीन ने प्रेमळ सदस्यांना पार्टी देण्याचे आश्वासक वचन दिले.. आणि पार्टीचे नियोजन करण्यात अतिशयच व्यस्त झाला..
दिवस रात्र सदस्य पार्टी पार्टी अशा घोषणा देत आहेत, अशी स्वप्ने जागे असताना पडू लागली..
मोदीच्या नोटबंदीच्या काळात एवढ्या सदस्यांना एवढी मोठी पार्टी देणे हे एक फारच (अतिशयच) मोठेअसे आव्हान होते.. पण एडमीन च्या कर्तृत्वापुढे हे आव्हान शिवधनुष्य करंगळीने पेलण्यासारखे सोपे होते..
आणि एडमीन नियोजनाला लागला...
तर आता शेवटी पार्टीची final announcement करतो... 👅👅😊☺
शेवाळे बंधुंच्या आशीर्वादाने आणि एडमीन च्या management हि ३१ डिसेंबर ची जंगी पार्टी करण्याचे योजिले आहे. ३१ डिसेंबर रोजी एडमीन ला दुसरी महत्वाची विधायक कामे असल्यामुळे हि पार्टी थोडीशी लवकर करण्याचे ठरवले.. शिवाय ३१ डिसेंबर ला पोलिसांचा ठीक ठिकाणी अतिशय कडक असा बंदोबस्त असतो.. आपल्या समूहातील सदस्यांचा कर्तव्यदक्ष पोलिसांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून देखील पार्टी लवकरच करण्याचे ठरवले..
पार्टी चे स्थळ, काळ, वेळ, time, मुहूर्त, समय, नक्षत्र, ई. खालीलप्रमाणे: तर पार्टी हि येत्या २४ डिसेंबर, २०१६ (शनिवारी) रोजी करण्याचे योजिले आहे.
पार्टी चे स्थळ: लक्ष्मि lawns, मगरपट्टा , वेळ- सायंकाळी ७ च्या पुढे ।
विशेष टीप- समूहातील तंगाट सदस्यांनी आपापली पिण्याची सोय करावी. एडमीन हा मारुतीचा भक्त असल्यामुळे पार्टी हि पूर्ण पणे शाकाहारी राहील.
येण्या जाण्याची सोय आपापल्या परीने करावी. येण्या जाण्याचा भत्ता एडमीन ला मागू नये. जमल्यास येताना स्वचित्रदांडू घेऊन यावा कुणाकडे असल्यास, म्हणजे आपल्याला स्वचीत्र काढणे सोपे होईल..
आणि परत inbox मध्ये येऊन पार्टी कब हे, पार्टी कब हे?? असे विचारून एडमीन ला त्रास देऊ नये..
पार्टी साठी आपली सर्वांची उपस्थिती गरजेची आहे नाहीतर एडमीन चे management व्यर्थ आहे..
धन्यवाद.. भेटू पार्टी ला..
(पार्टी ची टीप कुणीही पोलिसांना देऊ नये हि नम्र विनंती)
एडमीन ने एक बार commitment कर दि तो कर दि....
फिर वो खुद एडमीन कि भी और Jan Koum कि भी नहि सुनता..
आणि वाचुन झाल्यावर पोस्टवर कमेंट करन्यास कंजूषपणा करू नये ।
असा हा निमंत्रनाचा भला मोठा मेसेज..
यावर समूहातील सदस्य प्रसाद गव्हाणे यांनी खालील शब्दप्रयोग सुचवले:
Inbox - अंतरखोके
Management - व्यवस्थापन
Announcement - घोषणा/जाहीर
Commitment - वचन
