Thursday, 17 September 2015

Haters

Don't Hate The HATERS. Don't waste your valuable time on hating the HATERS.. Instead LOVE them.... They are one of the person in your LIFE, who makes you FAMOUS.. So why to  HATE...??

Sunday, 23 August 2015

कधीतरी......काहीतरी.......कुणासाठीतरी......

नमस्कार...
वंदे मातरम्...
मी मयुर अनिता  गंगाराम मोरे..
आजपासून मी इथे माझ्या ब्लॉगवर,
कधीतरी......काहीतरी.......कुणासाठीतरी......
वेळ मिळेन तसा, भावनांचा मेळ बसेल तसा, कुणासाठीतरी लिहावेसे वाटेल तेव्हा, आठवणी येतील तेव्हा,,
काहीतरी माझ्या कुवतीप्रमाणे लिहित जाणार आहे..
आठवणी साठवून ठेवायच्या आहेत मला..
जीवनात कोणी साथ देऊ अगर न देऊ, आठवणी मात्र सदैव आपल्याला आयुष्यभर साथ देतात..
मग त्या कटू असो वा आनंदी,, सुखाच्या असो वा दुखाच्या.. त्यांचे ओझे हे आपल्याला वाहावेच लागणार आहे..
कुणाला कमी तर कुणाला जास्त..
कुणाला चांगले तर कुणाला वाईट..
असो....

तर इथे मी माझ्या आठवणी, माझे विचार जपून ठेवणार आहे..
विस्मृतीत न जाव्या म्हणून..

कुणीतरी वाचावे, कुणीतरी उत्तर द्यावे , कुणीतरी अभिनंदन करावे,
याची मला मुळीच अपेक्षा नाही (अपेक्षा हेच निराशेचे कारण आहे)....
गीतेत सांगितलेच आहे,
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन....

बास झाले आता...

मित्र ( माझ्या सर्व जीवन मित्रांना समर्पित )

कोण असतो हा मित्र???
नेहमी आपल्यासोबत नसून सुद्धा ज्याला आपल्या नेहमीच्या सर्व गोष्टी माहिती असतात.....
एक वेळेस आपण आनंदात असताना आपल्याबरोबर नसेन, पण दुखात मात्र नेहमी आपल्या सोबत असेल....
ज्याला आपल्यासाठी वेळ काढावा लागणार नाही, तर त्याचा संपूर्ण वेळ हा आपल्यासाठी असेल.....



अजून बरेच लिहायचे बाकी आहे रे....